मुंबई, दि.७ – वेगाने विकसित होणार्या बीपीओ (कॉल सेंटर) क्षेत्रामध्ये भारताने चांगली आघाडी घेतली आहे. २०११-१२ मध्ये भारताला या क्षेत्रातून १५.९ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला असल्याचे‘ नासकॉम’ च्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. जागतिक बाजारात या क्षेत्रामध्ये फिलिपिन्स आघाडीवर असला तरी भारतानेही गेल्या वर्षात या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशाला या व्यवसायातून १५.९ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला होता तर २०११-१२ मध्ये १४.२ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला होता. परदेशात मोठया प्रमाणात भारतीय कंपन्यांकडून सेवा देण्यात येते.
आर्थिक विकासात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे योगदान दिवसागणिक वाढत आहे. या क्षेत्रात लाखो रोजगार निर्माण होत असून, स्थानिक कंपन्यांच्या सेवांना व उत्पादनांना परदेशात चांगली मागणी आहे. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून करांत सवलत देण्यात येत आहे. तसेच वस्तूंवरील आयात शुल्क माफ करण्यात आले आहे. यामुळे ‘आयटी’ क्षेत्राची झपाटयाने प्रगती झाली आहे