दिल्लीतील शाळेत बॉम्बची अफवा

नवी दिल्ली, दि.७ – राजधानी दिल्लीमध्ये एका विद्यालयाबाहेर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने एकच गोंधळ उडाला. राजधानीतील इंडिया गेटजवळील कस्तुरबा गांधी मार्गावरील भारतीय विद्या भवन या शाळेबाहेर एका कथित पोस्टरद्वारे बॉम्ब ठेवल्याची माहिती दिल्याचे सांगण्यात आले. ही माहिती पालकांना कळताच त्यांनी एकच गोंधळ केला. पण पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून हा सर्व प्रकार म्हणजे अफवा असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली असता त्यांना संशयास्पद असे काही आढळून आले नाही. तसेच संबंधीत शाळेच्या बाहेर पोस्टर लावल्याची माहितीही चुकीची असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Comment