गॅलॅक्सी एस थ्री- जूनमध्ये भारतात उपलब्ध होणार

 नवी दिल्ली दि.७- सॅमसंगचा गाजावाजा झालेला गॅलॅक्सी एस थ्री हा सेलफोन जूनमध्ये भारताच्या बाजारपेठांत दाखल होत असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे. युरोपच्या बाजारपेठेत हा फोन २९ मेपासून उपलब्ध होणार असून त्यापाठोपाठ तो भारताची बाजारपेठ काबीज करण्यासाठी सज्ज होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात तो भारतात उपलब्ध होईल.
  या सेलफोनच्या किंमतीबाबत अद्यापी कांही जाहीर करण्यात आले नसले तरी त्याची किंमत साधारणपणे ३५ हजारापासून पुढे असेल असे समजते. १३३ ग्रॅम वजनाच्या या फोनची जाडी अवघी ८.६ मिमि असून त्यात आठ मेगापिक्सलचा कॅमेराही आहे. अँड्राईड ४.० आईस्क्रीम सँडविच ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या या फोनला क्वाड कोमर मायक्रोप्रोससरही देण्यात आला आहे.
  १६ जीबी, ३२जीबी व ६४ जीबी अशा तीन मॉडेल्समध्ये तो उपलब्ध असून वायफाय,एनएफसी, ब्लू टूथ अशी त्याच्यासाठी कनेक्टीव्हिटी ऑप्शन्सही देण्यात आली आहेत.

Leave a Comment