सेफ बाईक ड्राईव्हिंगसाठी यामाहाची जनजागरण मोहीम

नवी दिल्ली दि.५- मोटरबाईक सेगमेंटमध्ये दबदबा असलेल्या यामाहा कंपनीने तरूणाईसाठी गेली कांही वर्षे चालविलेल्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित ड्राईव्हिंगचे प्रशिक्षण नॉईडा येथील  बालभारती पब्लिक स्कूल मध्ये नुकतेच दिले. त्यात आठ ते तेरा वयोगटातील १०० शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परवानाधारक यामाहा प्रशिक्षकांनी बाईक ही फन असू शकते, साहस तसेच स्पोर्टीही असू शकते मात्र त्यावेळी सुरक्षेकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे हे दोन तासांच्या प्रशिक्षणांत मुलांना शिकविले. विशेष म्हणजे यातील एक तास थिएरीचा होता तर दुसर्‍या तासात मुलांना प्रत्यक्ष बाईक चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामाहा किडस सेफ रायडिंग सायन्स ऑफ द इयर शो या नांवाने या शोचे आयोजन केले जाते.
   यामाहा इंडियाचे विक्री आणि विपणन संचालक जून नकाटा या विषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, शहरी भागात दुचाकींचे प्रमाण वाढत चालले असतानाच रस्ते अपघाताचे आणि त्यात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या ही वाढत चालली आहे. तरूण मुलांना बाईक चालविताना स्टंट करायला आवडते. त्यांची वाहन चालविण्याची पद्धतच बदलली आहे. मात्र वाहन चालविताना सुरक्षा तंत्र कौशल्ये आत्मसात करणे हेही तितकेच महत्त्वाचे असून आम्ही आमची सामाजिक जबाबदारी या भावनेने ही जनजागरण मोहिम राबवितो आहोत. अपघातमुक्त प्रवास हे आमचे ध्येय आहे. आजपर्यंत अशा प्रकारचा उपक्रम २००८ सालापासून आम्ही हाती घेतला असून त्यात आत्तापर्यंत दिल्ली, मुंबई, पुणे, बंगलोर, चेन्नई, कोलकाता, नागपूर, डेहराडून, वाराणसी, गोवा, गुवाहाटी, जम्मू, अहमदाबाद, जमशेटपूर,उदयपूर, लखनौ अशा देशातील बहुसंख्य मोठया शहरांत ही मोहिम राबविली गेली आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता देशाच्या अंतर्गत भागातही हा उपक्रम राबविला जाणार आहे.

Leave a Comment