
श्रीनगर, दि. ५ – जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील नेयला गावात सुरक्षा सैनिक आणि अतिरेकी यांच्यात शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले.
पाच अतिरेक्यांचा एक गट नेयला गावात आल्याची माहिती. सुरक्षा सैनिकांना मिळताच त्यांनी संबंधित गावास वेढा घातला. या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी अतिरेक्यांनी सुरक्षा सैनिकांवर हल्ला केला. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणार्या दोघा अतिरेक्यांना सुरक्षा सैनिकांनी ठार मारले. पाच अतिरेक्यांपैकी तीन अतिरेकी सुरक्षा सैनिकांची चाहूल लागताच मध्यरात्रीच गाव सोडून पळून गेले, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. मात्र पोलीस अधीक्षक डॉ. हसीब मुघल यांनी केवळ दोनच अतिरेकी संबंधित गावात आले होते, असे स्पष्ट केले.
