मलेशियन खुली बॅडमिंटन स्पर्धा; पी सिंधू उपांत्य फेरीत

क्वालांलापूर, दि. ४ – मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी. सिंधूने उपांत्यफेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने जपानच्या काना इटो हिचा २१-१९, २१-१५ अशा फरकाने पराभव केला. मात्र पुरुष एकेरीत मात्र भारताच्या पदरी निराशाच आली. पहिल्या सामन्यात मलेशियाच्या मोहम्मद हाफिज हाशिमने भारताच्या प्रणोय एच.एस. याला २१-१४, २२-२० ने नमवले. तर दुसर्‍या पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्ता या तिसर्‍या मानांकित खेळाडूने भारताच्या सातव्या मानांकीत सौरभ वर्माचा २१-१७, २१-१४ ने पराभूत केले.

Leave a Comment