
कोल्हापूर, दि. ४ – कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि ज्येष्ठ नेते खासदार सदाशिवराव मंडलिक या पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये कागल तालुक्यात पुन्हा एकदा रणधुमाळी रंगणार आहे. हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घोषित झाली असून, येत्या १२ जून रोजी मतदान होणार आहे.
या साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये मुश्रीफ यांचे खासदार मंडलिक यांच्या बरोबरीनेच भागभांडवल उभारणीपासून योगदान होते. आता मात्र दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याने संचालक पदाच्या २२ जागांसाठी होणारी ही निवडणूक पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात लक्षवेधी ठरणार आहे.