गॉसिप हा माझ्या व्यवसायाचाच एक भाग- नर्गिस फक्री

 रॉकस्टारमधून गेल्या वर्षी चमकलेली आणि पदार्पणातच धुम मचविलेल्या नर्गिस फक्रीने सहा महिन्यानंतर दुसरा चित्रपट साईन केला आहे. अक्षयकुमारच्या बॅनरतर्फे प्रकाशित होणार्‍या खिलाडी ७८६ मध्ये ती अक्षयकुमार सोबतच काम करणार असून अक्षयच्या ग्रेझिंग गोट पिक्चर्स या बॅनरबरोबर तीन चित्रपट करण्याचा करार तिने केला असल्याचे समजते. त्यातील हा पहिला चित्रपट आहे.
  दुसर्‍या दोन चित्रपटांबाबत आत्ताच कांही बोलणार नाही असे सांगताना नर्गिस म्हणते की रॉकस्टारपेक्षा यातील भूमिका खूपच वेगळी असून खिलाडी ७८६ हा कॉमेडी चित्रपट आहे. या भूमिकेबाबत ती खूपच उत्सुक आहे. कांही वर्षांपूर्वी न्यू यॉर्कमधून मुंबईत आलेल्या नर्गिसच्या मते भारतात येऊन तिला थोडेच दिवस झाले आहेत पण या काळात खूप घडामोडी घडल्या आहेत. तिच्यासाठी हे वेगळे आव्हान आहे आणि ते स्वीकारण्यासाठी ती खूप मेहनत घेते आहे. नृत्याचे धडे घेणे, वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, उदघाटन समारंभ अडेंट करणे आणि स्क्रीप्ट वाचन करणे हे तिचे फावल्या वेळातले उद्योग आहेत म्हणे!
  चित्रपटसृष्टीत आल्यापासून तिचे नांव सतत कोणाशी ना कोणाशी जोडले जाते आहे याबाबत बोलताना ती म्हणते, गॉसिप हा माझ्या व्यवसायाचाच भाग म्हणून मी त्याकडे पाहते. सगळ्या जगभरातच हे चालले आहे. मी अशा अफवा ऐकते आणि हसून सोडून देते त्यावर खुलासा करत बसणे मला आवडत नाही.

Leave a Comment