अंतिम लढतीत रिअल माद्रिदचा ऍथेलेटीक बिलबाओ वर विजय

माद्रिद, दि. ३ – स्पॅनीश लीग स्पर्धेत रिअल माद्रिदने उपांत्य फेरीत बार्सिलोनाचे आव्हान संपृष्टात आणत बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऍथलेटीक बिल्बाओ क्लबला ३-० असे पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. माद्रिदने तब्बल चार वर्षांनी या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
    माद्रिदतर्फे गोंजालो हिग्वेन याने १६ व्या, मेसुत ओजिल याने २० व्या आणि जगातील अव्वल खेळाडू असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने ५० व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. माद्रिदचे खेळाडू आक्रमक खेळ करीत असताना बिल्बाओच्या खेळाडूंना मात्र मिळालेल्या संधींचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले.
    या उत्साहवर्धक विजयानंतर माद्रिदचे प्रशिक्षक मोरिन्हो कमालीचे आनंदी दिसत होते. तर बार्सिलोनाच्या गोटात निराशा दिसत होती. बार्सिलोनासाठी हा हंगाम अतिशय खराब गेला आहे. प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे हैराण झालेल्या या नामांकित क्लबला चॅम्पिअन व त्यापाठोपाठ स्पॅनिश कप स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले