माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्याचे वजन चर्चेत

आपल्या सौदर्यांने आणि अदाकाराने बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केलेल्या ऐश्वर्याराय बच्चन हिचे वाढलेले वजन हा बॉलिवूडच्या चर्चेचा विषय झाला आहे. ऐश्वर्याने १६ नोव्हेंबर रोजी कन्यारत्नाला जन्म दिल्यानंतर ती अजिबात बाहेर दिसली नव्हती. पण नुकतीच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिलेल्या पार्टीला तिने हजेरी लावल्यानंतरचे तिचे जे फोटो  प्रसिद्ध झाले त्यावरून एकच गहजब माजला आहे. ट्वीटर,फेसबुकवरूनही लोक प्रतिक्रिया देत आहेत.
  ऐश्वर्या सेलिब्रेटी आहे आणि फिट राहणे ही तिच्या व्यवसायाची गरज असल्याने तिने वजन कमी करावे असे सल्ले दिले जात असतानाच व्हिक्टोरिया बेकहम कडे पहा म्हणावे, तिनेही मुलीला जन्म दिला आहे पण तिने वजन कसे आटोक्यात आणले आहे अशीही कॉमेंट केली जात आहे. आजपर्यंत सौंदर्याचे कौतुक करून घेतलेस आता टीकाही सहन कर असेही मत कांही जण नोंदवत आहेत तर काही जणांनी मात्र बाळंतपणानंतरचे वजन उतरण्यास वेळ लागतो तेव्हा ऐश्वर्याला वेळ द्यावा असेही मत दिले आहे.
  डबल हनुवटी आणि चांगलेच वाढलेले वजन यामुळे ऐश्वर्या मात्र अजिबात चिंतावलेली नाही. ती आपले मातृत्त्व खर्‍या अर्थाने एन्जॉय करते आहे असे दिसते आहे. कारण बेटी बी सह ती दुबईत मौजमजा करते आहे.

Leave a Comment