टीव्हीएस ‘अपाची’ ची नवीन श्रेणी

   मुंबई, दि. २ – मोटारसायकलची निर्मिती करणार्‍या टीव्हीएसने ‘अपाची’ ची नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. अपाची आरटीआर २०१२ ही नवीन श्रेणी नुकतीच लॉंच केली. या प्रकारातील आरटीआर १६०, आरटीआर १८० व आरटीआर १८० एबीएम या मोटारसायकलींमध्ये आरटीआर २०१२ च्या श्रेणीनुसार बदल करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामध्ये एलईडी लाईटचा पायलट लँप बसविण्यात आला आहे. रेसिंग मोटारसायकलच्या दृष्टीने अपाची विकसित करण्यावर भर देण्यात आल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. आरटीआर १६० ची किंमत ६७ हजार ५०५ रूपये, आरटीआर १८० ची ७२ हजार ९० रूपये व आरटीआर १८० एबीएमची किंमत ८२ हजार ७८० रूपये असेल असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment