खेळाडू म्हणून राहणेच मला पसंत-सचिन तेंडुलकर

पुणे दि.१-‘ मी राजकारणी नाही. मी खेळाडू आहे आणि खेळाडू म्हणूनच राहणे मला पसंत आहे , असे क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकर याने पुण्यात सांगितले. राज्यसभेसाठी नॉमिनेशन मिळाल्यानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात तो बोलत होता. त्याच्या शतकांचे शतक झाल्याच्या निमित्ताने त्याचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बोलताना तो म्हणाला की त्याने आजपर्यंत जे मिळविले ते सारे क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानातूनच मिळविले आहे. राज्यसभेवर नियुक्ती हाही त्याचाच एक भाग असल्याचे मी मानतो. ही जबाबदारी मोठी आहे. मात्र खेळणे थांबवून राजकारणात उतरण्याचा माझा अजिबात विचार नाही. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही मी खेळासाठीच काम करणार असून माझ्या क्रिकेटमधील प्रचंड अनुभवाचा फायदा नवोदितांना व्हावा अशी माझी इच्छा आहे. या कामी लोकांचाही मला पाठिबा लाभेल अशी आशा मी व्यक्त करतो.

1 thought on “खेळाडू म्हणून राहणेच मला पसंत-सचिन तेंडुलकर”

  1. Subodh Mahajan

    sachincha ha nirnay mala aavadala nahi…to ek changala kheladu aanhe aani rajkarnapasun door rahil pahije. marathi mansane asha rajkarni batmya pasun door rahila pahije.

Leave a Comment