जिल्हाधिकारी मेनन यांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न, तिसर्‍या टप्प्यातील चर्चा सुरू

रायपूर, दि. २८ – ओडिशामधील आमदार झिना हिकाका यांच्या सुटकेनंतर सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एलेक्स पॉल मेनन यांच्या सुटकेसाठी देखील जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मेनन यांच्या सुटकेसाठी मध्यस्थी करण्यासाठी नेमलेले सदस्य आणि माओवाद्यांमध्ये शनिवारी तिसर्‍या टप्प्यातील चर्चेस प्रारंभ झाला. याआधी गुरूवारी आणि शुक्रवारी झालेल्या चर्चेतून काहीही निष्पन्न होऊ शकले नव्हते.

जिल्हाधिकारी मेनन यांचे गेल्या शनिवारी माझीपारा या गावातून अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी आठ माओवाद्यांना सोडण्याची मागणी केली होती. माओवाद्यांशी या संदर्भात चर्चा कऱण्यासाठी छत्तीसगड सरकारने तीन अशासकीय संवादकांची नियुक्ती केली होती.

Leave a Comment