भारत भेटीदरम्यान आण्विक निर्बंध मुद्यांवर चर्चा करणार हिलरी

वॉशिंग्टन,  दि. २८ – अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिटंन पुढील महिन्यात भारत दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यादरम्यान हिलरी आण्विक निर्बंध मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
    यासंबंधी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया न्यूलँड यांनी सांगितले की, हिलरी दिल्ली आणि कोलकाता शहरांना भेट देणार आहेत. तसेच आण्विक निर्बंध मुद्यांवरही त्या चर्चा करणार आहेत. या भेटी दरम्यान त्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन आणि म्यानमार सहित महत्त्वपूर्ण क्षेत्रीय आणि वैश्‍विक मुद्यांवर भारताच्या नेतृत्वाची चर्चा करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment