
नवी दिल्ली दि.२७- जागतिक पतमानांकन करणार्या स्टँडर्ड अॅन्ड पुअर कंपनीने भारताची पत कमी करून ती स्टेबल वरून निगेटिव्ह केली असली तरी देशाची दीर्घकालीन वाढ क्षमता चांगलीच असल्याचे मत नियोजन आयोगाचे माँटेकसिग अहलुवालिया यांनी व्यक्त केले आहे. क्लिन एनर्जी मंत्रालयाच्या काल पार पडलेल्या तिसर्या बैठकीत ते बोलत होते.
अहुलवालिया म्हणाले की गतवर्षी भारताचा ग्रोथ रेट ६.९ टक्के होता तो यावर्षी ८ ते ९ टक्क्यावर जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपला मॅक्रो इकॉनॉमिक हक्क मात्र मिळायला हवा. भारताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.प्रश्न इतकाच आहे की गतवर्षीपेक्षा यंदा म्हणजे २०१२-१३ मध्ये ग्रोथ रेट वाढेल की नाही हा. पण आशियात चीन आणि भारत यांचा ग्रोथ रेट नेहमीच वाढ दाखवितो आहे. स्टँडर्ड पुअरने आपली पत कमी केली असली तरी त्याची काळजी करण्याचे कारण नाही.
या विषयावर अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अगोदरच त्यांचे मत दिल्याने त्याविषयी बोलणार नसल्याचेही अहलुवालिया यांनी सांगितले. तसेच रिझर्व्ह बँकेनेही आपली आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याचे सांगितले असल्याकडेही त्यांनी मुद्दाम लक्ष वेधले.
