राजस्थान न्यायालयाचे शाहरूखला समन्स

जयपूर दि.२७- बॉलिवूडचा डॉन शाहरूखखान याला सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यासंबंधी जयपूर न्यायालयाने समन्स जारी केले असून त्याला २६ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
    आयपीएल सामन्यातील राजस्थान रॉयल्स व कोलकता नाईट रायडर्स यांच्यात ८ एप्रिल रोजी सवाई मानसिग स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्याला शाहरूख उपस्थित होता. राजस्थानात २००० सालापासून सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानाला कायद्याने बंदी असतानाही या सामन्याच्या वेळी शाहरूख हजारो प्रेक्षकांच्या देखत धुम्रपानाचा आनंद लुटत होता.दूरदर्शन वाहिन्यांवरूनही या प्रसंगाची लाईव्ह दृष्ये दाखविली गेली होती. त्यावर जयपूर क्रिकेट अकादमीचे संचालक आनंदसिंगग राठोड यांच्यातर्फे वकील नेमसिंग राठोड यांनी शाहरूखच्या विरोधात न्यायालयात फिर्याद दाखल केली.
   बाकी सर्व प्रेक्षकांना स्टेडिअमध्ये सोडण्यापूर्वी त्यांची कडक तपासणी केली जात होती आणि त्यांच्याजवळ सिगरेट बिडी सापडल्यास ते काढून घेतले जात होते मात्र शाहरूखची तपासणीच केली गेली नाही असे फिर्यादीत नमूद करतानाच पोलिसही तितकेच दोषी असल्याचेही म्हणण्यात आले आहे.
  आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा शाहरूख को ओनर आहे.

1 thought on “राजस्थान न्यायालयाचे शाहरूखला समन्स”

  1. नम्रता धुमाळ

    शाहरुखने पब्लिक मध्ये स्मोकिंग करणे बेजवाबदार पानाचे लक्षण आहे….असे marathi news टाकत जा.

Leave a Comment