हलक्या-फुलक्या विषयावर बालचित्रपट हवेत – राज ठाकरे

पुणे, दि. २५ – मराठी चित्रपट हे एक तर पराकोटीचे धीरगंभीर असतात किंवा पराकोटीचे विनोदी असतात, त्यामुळे बालमनाला ते समजण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे बालमनाचा विचार करून हलक्या-फुलक्या मराठी बालचित्रपटांची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
    एका  कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता ठाकरे म्हणाले, ‘चित्रपट हे माझे ‘पॅशन’ आहे, प्रचंड आवडीचे क्षेत्र आहे. असे असतानाही मी राजकारण आणि चित्रपट अशा दोन दगडांवर पाय ठेऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण केवळ राजकारणात असल्याकारणाने आपणाला या विषयाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मला बालचित्रपटांबाबत नेहमीच वेगवेगळ्या कल्पना सूचत असतात. त्या आपण एक दिवस नक्कीच एखाद्या निर्मात्याशी बोलून त्याच्याशी ‘शेअर’ करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपणाला चित्रपटाचा निर्माता होता आले नाही. मात्र, या माध्यमातून कार्यकारी निर्माता बनण्याची संधी मिळाली तर  ती दवडणार नाही. ’

Leave a Comment