राखी सावंत साकारणार भंवरीदेवी

 भंवरीदेवीचे अपहरण- हत्या प्रकरणाची भुरळ हिंदी चित्रपटसृष्टीला पडाली  असून या घटनेवर आधारित चित्रपट बनविण्यात येत आहे. या चित्रपटात भंवरीदेवीची भूमिका राखी सावंत साकारणार आहे.
    राखीला या भूमिकेसाठी विचारण्यात आले, त्यावेळी राखीने त्वरित होकार दिला आहे. सध्या ती राजस्थानकडे रवाना झाली असून भंवरीदेवीविषयीची माहिती गोळा करत आहे.  भंवरीदेवीच्या घरी तसेच,  ज्या रुग्णालयात ती नोकरी करत होती, त्या रुग्णालयालाही राखी  भेट देणार आहे. भंवरीदेवीची भूमिका करण्यासाठी तिच्याबाबतची इतंभूत माहिती गोळा करणार असल्याचेही राखी सांगते.
    राखीच्या मते भंवरीदेवीचे हे प्रकरण अत्यंत आश्‍चर्यकारक आहे. ती प्रचंड आदरयुक्त महिला होती. तिने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. तिने एका मंत्र्याबाबतचे सत्य उघड केले होते.  एखादी भूमिका करण्यासाठी आमीर ज्याप्रमाणे अभ्यास करतो, त्याप्रमाणेच मीदेखील अभ्यास करून हा चित्रपट करेन, असे तिने सांगितले आहे.
    जोधपूर येथे नर्स असलेल्या भंवरीदेवीचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तिची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. राजस्थानमधील माजी मंत्री महिपाल मदेरणा यांच्याशी  असलेल्या संबंधांवरून भंवरीदेवीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती होती.

Leave a Comment