धार्मिक आणि कुटुंबवत्सल रणबीर

 बॉलिवूडमध्ये आपले स्थान बळकट करू पाहात असलेला कपूर घराण्याचा दिवा रणबीर अतिशय धार्मिक स्वभावाचा आहे बरं का! आता हेच पाहा ना ! कोणतीही नवी वस्तू घेतली अर्थात महागडी वस्तू घेतली की तो थेट जवळ जे मंदिर असेल तेथे जाऊन देवाचा आशीर्वाद घेतो. त्याची लेटेस्ट खरेदी आहे महागडी आणि आलिशान न्यू ऑडी ए-८ ही गाडी. आठ महिन्यांपूर्वी नोंदविलेली ही गाडी त्याला दोनच दिवसांपूर्वी मिळाली. पांढर्‍या रंगाची ही आकर्षक गाडी पाहताच त्याचा आनंद गगनात मावेना. मात्र गाडी घेताच प्रथम त्याने मंदिर गाठले. देवाचा कृ पाशिर्वाद मागितला. आणि यावेळी त्याच्या बरोबर होती ती आई नीतूसिग. रणबीर आईवेडा आहे असेही सांगितले जाते.
  ऑडी ए-८ ही रणबीरच्या ताफ्यातली दुसरी महागडी गाडी. पहिली ऑडी स्पोर्टस व्हर्जन आहे. ही गाडी मिळण्याअगोदर तो नुकताच मनालीतील शूटींग संपवून परतला होता. बहुतेक सर्व बॉलिवूड नटांप्रमाणेच रणबीरलाही आलिशान, महागड्या गाड्यांचा शौक आहे. या गाडीतून आईला पहिली सफर घडविताना त्याचे वडील ऋषीकपूर मात्र परदेशात शुटींगमध्ये व्यस्त आहेत. अर्थात आईची राईड संपल्यावर संध्याकाळी त्याने आपले मित्र अयान मुखर्जी आणि अर्जुन कपूर यांच्यासमवेत पार्टी साजरी केली. बांद्रयातून गाडी घुमवितानाच बांद्रा सी-लिंकवर गाडी चालविण्याचा आनंदही मनमुराद लुटला.
  या सेलिब्रेशनमध्ये रणबीरने कोणत्याच गर्ल फ्रेंडला इनव्हाईट केले नव्हते हे विशेष.

Leave a Comment