यशवंतराव चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष यंदा उत्साहात साजरं

    महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष यंदा साजरं होत आहे. त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने यशंवतराव चव्हाण यांच्या देदीप्यमान आणि भव्य कारकीर्दीचं समग्र दर्शन घडवणारी कलाकृती सादर करण्याची जबाबदारी `मराठी बाणा’, `आवाज की दुनिया’, `आझादी पचास’सारखे भव्यदिव्य कार्यक्रम देणारे अशोक हांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
    या महानाट्यासाठी त्यांनी जवळजवळ सहाशे जणांची संशोधन, निर्मिती आणि प्रत्यक्ष प्रयोग साकारणारी फळीच उभी केली. यशवंतरावांच्या कार्यकाळावर प्रकाश टाकणारी आणि त्यांचे जीवन चरित्र मांडणारी २८ पुस्तकं यांचे संदर्भ या महानाटयासाठी वापरले गेले आहेत. यशवंतरावांचं वास्तव्य असलेल्या जागांचं प्रत्यक्ष चित्रीकरण, त्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांच्या, कायकर्त्यांच्या आणि दिग्गजांच्या मुलाखतीतून हे महानाटय आकारास आलं. `मी यशवंत!’ या नावाने रंगमंचीय तसेच दृक् श्राव्य माध्यमांचा समावेश करत प्रत्यक्ष चित्रीकरण, नाटयप्रसंग, कविता, चित्रपटगीतं यांचा संगम असलेलं महानाटय यशवंतरावांचा जीनवप्रवास ओघवत्या शैलीत प्रेक्षकांसमोर मांडतं. हे महानाटय लवकरच राज्यात सर्वत्र सादर होईल.

Leave a Comment