झोपेशी संबंधित आजाराने मृत्यूचा धोका – डॉ. माग्ने तिन्ततेव्हिरिम

मुंबई, दि. २१ – घोरणे, निद्रानाश या झोपेशी संबंधित आजारांवर तात्काळ उपचार न घेतल्यास हायपरटेन्शन, स्थूलता, मधुमेह यासारखे आजार वाढीस लागतात. एवढेच नव्हे तर झोपेशी संबंधित आजाराने श्‍वसनाचेही आजार होतात आणि रुग्णाला मृत्यूचा धोका निर्माण होऊन रुग्ण दगाऊ शकतो, अशी माहिती ‘घोरणे व स्लीप ऍग्निया’चे व्यवस्थापन व उपचार करणारी जगातील आघाडीच्या युरोस्लीप कंपनीचे सीईओ व आधुनिक स्लीप सर्जरीचे जनक म्हणून प्रसिध्द असलेले डॉ. माग्ने तिन्तनेव्हिरिम यांनी आज येथे दिली.
    मुंबईतील ‘प्रेस क्लब’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युरोस्लीप कंपनी झोपेशी संबंधित आजारांवर यशस्वीरित्या उपचार करुन रुग्णांना आरोग्यदायी आयुष्य देण्याचे कार्य नॉर्वे, बर्लिन, हॅम्बर्ग, युनायटेड किंग्डम आदी अनेक देशात स्लीप क्लिनिकद्वारे केले जाते.
    युरोस्लीपच्या एशिया खंडातील पहिल्या स्लीप क्लिनिकची सुरुवात मुंबईतील आघाडीचे ईएनटी विशेष तज्ज्ञ डॉ. अशीम देसाई यांच्या सहकार्याने करण्यात आली. भारतात १६ कोटी लोकांना झोपेशी संबंधित आजार असण्याची शक्यता डॉ. माग्ने यांनी व्यक्त केली.
    झोपेशी संबंधित आजारांवर नियंत्रण मिळवल्यास कोट्यवधी भारतीयांची जीवनशैली बदलू शकेल, असा विश्‍वास युरोस्लीप एशियाचे सीईओ मोहन नायर यांनी व्यक्त केला.
युरोस्लीप बरोबर या प्रकल्पासाठी भागिदारी करताना मला आनंद वाटतो. भारतातील रुग्णांना डॉ. माग्ने यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवाचा फायदा होऊन स्लीप स्टडीजच्या अभ्यासाचाही अधिक उपयोग होऊ शकेल, असे ए. बी. आर. देसाई क्लिनकचे ईएनटी विशेष तज्ज्ञ डॉ. अशीम देसाई यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment