आरोग्य छोटया-मोठया शारीरिक समस्यांवर चटकन करता येणारे घरगुती उपाय –

१.    केस पांढरे होणे – १०० ग्रॅम खोबरेल तेलात २० ते २५ लाल जास्वंदीची फुले मंद आचेवर तळून काढावीत. पाण्याचा अंश गेला की फुलांसकट तेल गार होउ द्यावे व मग गाळून बाटलीत भरावे.  हे तेल आठवडयातून किमान दोन वेळा केसांना लावावे.जास्वंद हा उत्तम नैसर्गिक डाय असून त्याचे इंग्रजी नाव ‘शू फ्लॉवर ’ असे आहे. पूर्वीच्या काळी ही फुले बुटांना पॉलिश करण्यासाठी वापरली जात असत.
२.    केस गळणे – आजकाल अगदी शालेय विद्याथ्यांपासून सर्वांनाच ही समस्या भेडसावते आहे. हवेतील प्रदूषण, शांपूचा अतिरिक्त वापर, आहारातील त्रुटी ही त्या मागची मुख्य कारणे असू शकतात. संत्रे, अननसाचा रस रोज १ ग्लास या प्रमाणे १५ दिवस प्यायला असता केस गळती कमी होते.
३.    चाई लागणे – हा एक प्रकारचा त्वचा रोग आहे पण त्यावर १०० टक्के खात्रीने औषधोपचारच्या साहाय्याने इलाज करता  येतो.
४.    डोके दुखणे डोके दुखत असेल – तर आमसुले पाण्यात भिजत घालून, कुस्करून साखर-मीठ घातलेले सरबत अथवा कोकम सरबत घ्यावे. जागरणाने डोके दुखत असेल, तर १५ निनिटे झोप अथवा विश्रांती हा चांगला उपाय आहे. डोक्यातील कलकलही या विश्रांतीमुळे कमी होते.
५.    पित्ताने डोके दुखत – असल्यास गार दूध प्यावे.
६.    अर्धशिशीचा त्रास होत असेल तर – सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्यावर लावावा. शिंक  काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी  होते अथवा सकाळी उठल्याबरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते. अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते.
७.    डोळे चिकटणे- एरंडेल तेल गरम करून काजळासारखे घालावे. आजकाल या  तेलातही भेसळ असते. त्यामुळे खात्रीचे तेल आणून प्रथम त्याला एक उकळी द्यावी व गार झाल्यावर गाळून बाटलीत भरावे. हे तेल वापरण्यास निर्धोक असते.
८.    डोळे लाल होणे – दुधात पातळ कापड अथवा कापूस बुडवून त्याच्या घडया बंद डोळयांवर ठेवाव्यात.
९.    डोळे येणे – यावरही एरंडेल तेल काजळासारखे डोळयात घालण्याने आराम पडतो.
१०.    डोळे खाजणे – यावरही वेरीलप्रमाणे उपाय करावा.
११.    रांजणवाडी आल्यास – खारीक बी पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीवर लावावा. ८ दिवस हा उपचार करावा.
१२.    डोळयात काही गेल्यास – कपात अथवा बशीत स्वच्छ पाणी घेउन त्यात पापण्यांची  उघडझाप करावी. अथवा कापूस ओला करून डोळे उघडून जेथे कण दिसेल तेथून अलगद फिरवावा. कापसाला चिकटून डोळयात गेलेला कण बाहेर येतो.
१३.    डोळयात घाण येत असल्यासही एरंडेल तेलच काजळासारखे डोळयात घालणे उपयुक्त ठरते.
१४.    डोळयांची जळजळ गार पाण्याच्या घडया अथवा पिकलेल्या केळयाची साल आतील बाजू डोळे बंद करून त्यावर ठेवावी.

Leave a Comment