पद्मजा फेणाणी यांच्या भक्तीसंगीताने श्रोते मंत्रमुग्ध

अक्क्लकोट, दि. १९ – सुप्रसिध्द गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर व सहकार्‍यांनी सादर केलेल्या भक्तीगीत संगीताने स्वामीभक्त रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘दत्त अवतार – श्री स्वामी समर्थ महाराजां’ च्या १३४ वी पुण्यतिथी निमित्त्य आयोजित धर्मसंकीर्तन महोत्सवात ११ वे पुष्प गुंफताना पद्मश्री फेणाणी जोगळेकर यांनी स्वामीचरणी गानसेवा समर्पित केली. प्रारंभी मंगलचरणी गजाननाने गानसेवेचा श्रीगणेशा केला. निघाले घेऊनी दत्ताची पालखी या गीताने स्वामीभक्तांना भजनात तल्लीन केले. अक्कलकोटी ध्यान लागले या गीतानी अक्कलकोट वासीयांच्या भावनेलाच हात घातला.
    ‘अरे अरे ज्ञाना झाला सी पावन’ सुनता है गुरुज्ञानी अचूक स्वर शब्द फेक, अचूक स्वराचा चढउतार यामुळे गीताची मोठ गोठ श्रोत्यांना चाखता आली. ‘पुरुषोत्तम श्रीराम नमामी’, ‘पायोजी मैने राम रेतन धन पायो’, ‘रुणू झुणू रुणू सुडू रे भ्रमरा’, अशी अविट गीते सादर केली. ‘स्वामी समर्थ नामस्मरण’, ‘दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा’ नामस्मरण सादर करुन भाविकांना ठेका धरायला लावला. नामस्मरण भजनात भाविकांना अक्षरशः देहभानहून तल्लीनहून नाचायला लावले. प्रारंभी धर्मसंकीर्तनाचे संयोजक पाठक यांनी पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा परिचय करुन दिला. देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
    या भक्तिसंगीतामध्ये तबल्यावर त्रिभुवन पटवर्धन मनोज देसाई, टाळवादन सूर्यकांत सुर्वे, ध्वनीक्षेपण व्यवस्था राजू दाभोळकर सिंथेसायझर मंदार पारखी आदीनी साथ संगत दिली. देवस्थानच्या वतीने या सर्व कलाकरांचा समर्थाची प्रतिमा कृपावस्थ शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी आदी भक्तगण उपस्थित होते.

Leave a Comment