`डर्टी’ पिक्चरच्या टी.व्ही. प्रसारणावर बंदी घाला

नागपूर, दि. १९ – `डर्टी’ पिक्चरच्या येत्या रविवारी होणारे टी. व्ही. वरील प्रसारण थांबविण्यात यावे,  अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूरपीठात दाखल करण्यात आली.
    या याचिकेवर सुनावणी करताना न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. अशोक भंगाळे यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय आणि अन्य प्रतिवादींना २० एप्रिल रोजी उत्तर मागविणारी नोटीस जारी केली आहे. अन्य प्रतिवादींमध्ये सेंन्सॉर बोर्ड, बालाजी फिल्म्स आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन यांचा समावेश आहे.
    सिनेअभिनेत्री विद्या बालन,  नसीरुद्दीन शहा,  इम्रान हाश्मी आणि तुषार कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट रविवार, २२ एप्रिल रोजी सोनी एन्टरटेन्मेंटच्या सेट मॅक्स वाहिनीवर दुपारी १२ आणि रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. प्रवीण किशोर डहाट यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी असे नमूद केले की, आपण सोनी टी. व्ही.वर आयपीएल ट्वेन्टी २० क्रिकेट सामने पाहत असताना डर्टी पिक्चरची जाहिरात दाखविण्यात आली.

Leave a Comment