मुंबई, दि. १९ – महापालिकेच्या नायर रूग्णालयात कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे आठ मृतदेहांचे शवविच्छेदन ८ दिवसांपासून रखडल्याची धक्कादायक माहिती शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आणली. तर मनसेचे चेतन कदम यांनी पालिका रूग्णालयात डॉक्टरांचीही कमतरता असल्याचे सांगितले. त्यावर प्रशासनाची बाजू मांडताना अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैस्कर यांनी मे महिन्याअखेरपर्यंत सर्व रिक्त पदे भरण्यात येतील, असे सांगितले.
नर्सेसची रिक्तपदे ही एस टीचे उमेदवार न मिळाल्याने रिक्त आहेत. डॉक्टरांची रिक्त पदेही भरली जातील. पालिकेला २५० डॉक्टर नव्याने उपलब्ध होतील. टेक्नेशियनची पदे भरण्यासाठी नियमांत काही बदल केले जातील. वॉर्डबॉय, आया, लेबर आदी पदे मे अखेरपर्यंत भरण्यात येतील, असे मानिषा म्हैस्कर यांनी सांगितले.
