चिमूर तालुक्यात होणार २५० मेगावॅटचा प्रकल्प

चिमूर, दि. १९ – गेल्या कित्येक वर्षांपासून चिमूर विधानसभा क्षेत्रात फारसा औद्योगिक विकास झाला नाही, जो काही विकास झाला त्यालाही कालांतराने ब्रेक लागले. परंतु आता क्रांतिभूमी चिमूर औद्योगिक विकासापासून दूर राहणार नाही. येथील युवकांना रोजगार मिळावा यासाठी युवाशक्ती प्रयत्नशील आहे आणि याच प्रयत्नाचे फलित म्हणजे चिमूर तालुक्यात कवठाळा येथील २५० मेगावॅटचा प्रस्तावित वीज प्रकल्प होय. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक जनसुनावणी येत्या २० एप्रिलला होत असून, या प्रकल्पामुळे किमान १२०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती युवाशक्तीचे संस्थापक कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी चिमूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
    भांगडिया म्हणाले की, चिमूर विधानसभा क्षेत्रात बेरोजगारांची मोठी फळी निर्माण झाली आहे. तरुणांसमोर रोजगार मिळविण्याचे मोठे संकट उभे असतानाच सामाजिक कार्य करणारी युवाशक्ती संघटना त्यांच्या मदतीसाठी पुढे धजावली आहे. कवठाळा येथे होणार्‍या २५० मेगावॅटच्या विद्युत प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या १२०० युवकांना रोजगार मिळणार आहे.

Leave a Comment