मुंबई, दि. १८ – शेतकर्यांना हमीभाव देण्याच्या मागणीवरुन स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकर्यांनी कांदा, बेदाणा उधळून दूधही ओतले. अधिवेशन सुरु असल्याचे जमावला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे संतप्त होऊन आपण कांदा व बेदाणा उधळल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
अंत पाहू नका ? राजू शेट्टी यांचा इशारा, गेली दोन महिने केंद्रापासून राज्याच्या मंत्र्यांपर्यंत दूध, कांदा आणि बेदाणा यांच्या हमी भावासाठी आंदोलन सुरु आहे, तरीही सरकारने कोणता निर्णय घेतलेला नाही. शेतकर्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत, शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहील.
या आंदोलनाची दखल सभागृहात विधेयकाची चर्चा सुरु असताना विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी लक्ष वेधून घेतली..
