
ठाणे, दि. १७ – तब्बल पाऊणशे कलाकारांच्या कलाकृतीचा आविष्कार बुधवारी रात्री आठ वाजता ठाणेकरांना गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या `सणाच्या गं माहेरी’ या रोप्यमहोत्सवी प्रयोगातून अनुभूतीस येणार आहे. या कार्यक्रमात सामाजिक प्रबोधन सांस्कृतिक वारसा आणि कलाकरांचा आविष्कार अशा तिहेरी संगणाचे दर्शन ठाणेकरांना होणार आहे.
कृती कला प्रतिष्ठान द्वारा निर्मिती ’सणांच्या गं माहेरी ’मध्ये नृत्यदिग्दर्शिका कविता कोळी आणि रमेश कोळी यांनी केले आहे. या कार्यक्रमात सामाजिक स्तरावर ’लेक वाचवा’ याचे प्रबोधन आणि जनजागृती करण्याचा संकल्प असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संयोजकांनी दिली. भारतीय संस्कृतिक स्त्रीचे वेगळे महत्व आहे. पण सामाजिक प्रवृत्तीला नेहमीच स्त्री काळी पडत असल्याने स्त्रीचे अस्तीत्वच धोक्यात आलंय. प्रबोधनाचे हेच स्त्रोत समाजिक सामाजिक तळागाळात पोहचावे असाच मानस या `सणाच्या गं माहेरी’ प्रयोगाचा आहे. या रौप्यमहोत्सवी प्रयोगात राष्ट्रीय कलाकार भारती पाटील व उमेश वने यांचा समावेश आहे.