खाद्य तेलाचे भाव भडकले उन्हाळ्याच्या तडाक्यात महागाईचेही चटके

सोलापूर, दि.१८ – खाद्यान्न, भाजीपाला पाठोपाठ खाद्यतेलाचे भाव भडकले असल्याने सर्वसामान्य नागरिकांना उन्हाळ्याच्या तडाक्यात महागाईचेही चटके बसत आहेत. खाद्यतेलाच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिक सोयाबीन तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. सोयाबीन तेलाच्या प्रतिकिलो दरात १० रुपये वाढ झाली आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी ५७ रु. प्रतिकिलो दर होता, तर आता ६७ रु. इतका दर आहे. शेंगदाणा तेलाच्या दरात २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे दर पुढीलप्रमाणे व कंसात मार्च महिन्यातील दर: १०० ते ११० (७८-८०), पामतेल ६६ (६०), सोयाबीन ६७ (५७), सूर्यफूल तेल ८३ (७७). पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधन दरवाढ झाल्याने खाद्यतेलाचे दर भडकले आहेत.

Leave a Comment