आरटीओ इमारतीसाठी ८ कोटी १० लाखाचा निधी मंजूर

पिंपरी, दि. १६ – पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बांधकामासाठी लागणारी तरतूद राज्य सरकारने मंजूर केली आहे. तरतुदीअभावी गेल्या तीन वर्षापासून रखडलेले बांधकाम सुरू होणार असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. तीन मजली कार्यालयाच्या बांधकामासाठी ८ कोटी १० लाख रूपये मंजूर केल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वनवास आता संपणार आहे.

Leave a Comment