जकातीचे खाजगीकरण रद्द करणार – राज ठाकरे

नाशिक, दि. १३ –  नाशिक महानगरपालिकेत जकात वसुलीचे केलेले खाजगीकरण रद्द करण्यात येईल,  असे आश्‍वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. महापालिकेत मनसेची सत्ता आल्यापासून शहरातील सर्व उद्योजकांनी जकातीचे खाजगीकरण रद्द करावे,  हे निवडणूक वचननाम्यात दिलेले आश्‍वासन मनसेने पाळावे, असा आग्रह धरला होता.
दरम्यान नाशिकच्या उद्योजकांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली,  तेव्हा राज यांनी जकातीचे खाजगीकरण रद्द होणारच व निवडणुकीपूर्वी दिलेला प्रत्येक शब्द मनसे पाळणारच असे ठामपणे सांगितले.
    गेल्याकाळात मनपात मनमानी असलेल्यांच्या राजवटीत जनतेचा विरोध असताना देखील जकात खाजगी करणाचा निर्णय घेण्यात आला होता. तो कसा मनपाच्या हिताविरुध्द असून मनपा महसुलाबरोबरच उद्योजकांनाही कसा अडचणीचा आहे याची माहिती नाशिक औद्योगिक संघटनेचे (निमा) धनंजय बेळे व ईतर पदाधिकारी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष माहिती करुन दिली. येत्या महासभेत तातडीने हा विषय ठेवण्यात येईल असा अंदाज असून नेमके आता महासभेत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment