
अहमदाबाद, दि. १२ – गुजरातमधील ओडगाव येथे झालेल्या जळीतकांड प्रकरणात न्यायालयाने बुधवारी १८ जणांना जन्मठेपेची तर अन्य ५ जणांना सात वर्षांची अशा एकूण २३ दोषींना शिक्षा ठोठावली आहे.
विशेष म्हणजे १ मार्च २००२ मध्ये झालेल्या या प्रकरणी न्यायालयाने ९ एप्रिल रोजी २३ जणांना दोषी ठरविले होते आणि तेवढ्याच लोकांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. ओडगावमध्ये झालेल्या या जळीतकांडामध्ये २३ लोकांनी आपले प्राण गमावले होते. गोध्रामध्ये रेल्वेगाडी जाळण्याव्यतिरिक्त तसेच सरदारपुराच्या भीषण नरसंहारच्या व्यतिरिक्त हे तिसरे प्रकरण आहे, ज्यात न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. या प्रकरणात एकूण ४७ संशयित आरोपी होते.