होमगार्डप्रमाणे नागरी संरक्षण दलाला सवलती, भत्ते देणार – गृहमंत्र्यांची घोषणा

मुंबई, दि. १२ – होमगार्डप्रमाणे नागरी संरक्षण दलाला सवलती आणि भत्ते देणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटिल यांनी जाहीर केले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हेही नागरी संरक्षण दलात अंतर्भूत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
भाजपचे आमदार संजय केळकर यांनी यासंदर्भात नागरी संरक्षण दलाची व्यथा व्यक्त केली होती. यावर दिलेल्या उत्तरात गृहमंत्र्यांनी राज्यात होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंदा त्यांच्यासाठी ६५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगत नागरी संरक्षण दलाच्या जवानांच्या भत्तावाढीचा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नागरी संरक्षण दलाच्या जवानांच्या भत्यांमध्ये वाढ करणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये दैनंदिन भत्ता दीडशे रूपयांवरून २५० रूपये, उपहार भत्ता १०० रुपये आणि कवायत व भोजन भत्ता ९० रूपयांनी वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment