देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या वाढली

मुंबई, दि. १२ – एकीकडे देशातील विमान कंपन्यांची आर्थिक स्थिती इंधन खर्चामुळे बिकट होत चालली असतानाच देशांतर्गत विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
    आयटाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावर ब्राझील व भारतात देशांतर्गत प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये १७.९ टक्के प्रवासी वाढले तर त्या खालोखाल भारतात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात देशात विमान प्रवाशांची संख्या १६.३ टक्क्यांनी वाढली होती.
    इंधनावरील खर्चात होणारी वाढ आणि आर्थिक मंदीच्या काळातही देशातील विमान कंपन्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचे आयटाने म्हटले आहे. यामध्ये एकूण प्रवासी क्षमतेच्या ७५ टक्के प्रवाशांनी प्रवास केला. जागतिक स्तरावर भारतातील विमान प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ दुसरी मोठी वाढ ठरली आहे.

Leave a Comment