
औरंगाबाद, दि. १२ – मुलींनी पाणी आणि बचतीचा निर्धार आपल्या प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणावा, असे आवाहन माजी महापौर व भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस सौ. विजयाताई रहाटकर यांनी केले. येथील शारदामंदिर प्रशाळेत सेव्ह वुई (वॉटर ऍण्ड एनर्जी) या विषयावरील निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करताना त्या बोलत होत्या. मुख्याध्यापिका सौ. शास्त्री या अध्यक्षस्थानी होत्या.
पाण्याचा आणि ऊर्जेचा साठा मर्यादित आहे आणि लोकसंख्या मात्र वाढते आहे. त्यामुळे आताच काळजी घेतली नाही तर भविष्यात महायुद्ध सुद्धा याच नैसर्गिक साधनांसाठी होवू शकेल असे त्या म्हणाल्या. ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारूरकर यांनी परिचय करून दिला. एसएमएस सीईटीपी या कंपनीच्या वतीने युगंधर बाल मासिकामार्फत घेण्यात आलेल्या या स्पर्धेमागची भूमिका आणि मुलींनी लिहिलेल्या निबंधांतील विशेष बाबींची माहिती युगंधरच्या संपादक संगिता धारूरकर यांनी दिली.