बीएसएनएलची गडचिरोलीत कुचराई

गडचिरोली, दि. ११ – नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात दूरसंचार सुविधा पोहचविण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. या भागात भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पोहचली नसल्याने नक्षल कारवायाही नियंत्रणात आणण्यास अडचणी येत आहेत.
राज्यात गडचिरोली जिल्हा नक्षल कारवायांनी सर्वाधिक पिडीत आहे. या जिल्ह्यातील नक्षलवादाची वाढती समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने येथे निमलष्करी दलसुद्धा पाठविले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा निर्मितीनंतरच नक्षली कारवाया वाढल्या. त्या संपुष्टात आणण्यासाठी विकास गतिमान करण्यावर भर देण्यात आला नाही. जिल्ह्यात १६६७ गावे आहेत. त्यापैकी ७२० गावांमध्ये अजूनही दूरसंचार सेवा पोहचलेली नाही. त्यामुळे या भागाचा तात्काळ संपर्क जिल्हा मुख्यालय, तालुका मुख्यालयाशी होत नाही. त्यामुळे या भागातील जनता सरकारच्या दूरसंचार सेवेपासून वंचित राहिली आहे.

Leave a Comment