ओडिशात ६ हजार मेगावॉटचा प्रकल्प

मुंबई, दि. १० – ओडिशात सहा हजार मेगावॉट असलेला ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून तो प्रकल्प पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित होईल. या प्रकल्पामुळे देशाच्या पूर्वेकडील भागात ऊर्जा पुरवठा शक्य होईल. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि उच्च क्षमता ऊर्जा वितरण केंद्र यांच्या संयुक्तपणे दहा हजार मेगावॉटचा प्रकल्प प्रस्तावित आहे. अंगूल व धेनमपाल या जिल्ह्यांमध्ये सुरू केल्या जाणार्‍या या प्रकल्पासाठी जिंदाल इंडिया थर्मल पॉवर, महानंदी अॅबॉन पॉवर, जी. एम. आर., कामरूंगा एनर्जी, जे. एम. पी. एल., भूषण एनर्जी, सी. ई. एस. पी., नवभारत व्हेंच्युअर, नाल्को बावनंघा पॉवर प्लान्ट आणि मोनिट यांचे सहकार्य घेतले आहे. या प्रकल्पासाठी तीनशे एकर जमीन लागणार आहे.

Leave a Comment