अल्पबचतीचे नवे व्याजदर जाहीर

मुंबई, दि. १० – अल्पबचत संचालनालयाने आर्थिक वर्ष २०१२-१३ साठी गुंतवणुकदारांसाठी नवीन व्याजदर जाहीर केले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. पीपीएफ योजनेचा पूर्वीचा दर ८.६ असून नवीन दर ८.८, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) ५ वर्षांसाठी मुदत योजनेचा दर ८.४ वरून ८.६ झाला आहे. एनएससी १० वर्षे मुदत योजनेचा दर ८.७ वरून ८.९, मासिक प्राप्ती योजनेचा दर (५ वर्षे मुदत) ८.२ वरून ८.५, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा दर (५ वर्षे) ९ वरून ९.३, रिकरिंग ठेव योजनेचा दर (५ वर्षे) ८ वरून ८.४, मुदत ठेव १ वर्ष दर ७.७ वरून ८.२, मुदत ठेव २ वर्षे दर ७.८ वरून ८.३, मुदत ठेव ३ वर्षे दर ८ वरून ८.४ आणि मुदत ठेव ५ वर्षे दर ८.३ वरून ८.५ जाहीर करण्यात आला आहे.
नव्या व्याजदरानुसार दहा हजार रूपयांच्या ५ वर्षे मुदतीच्या ’एनएससी’ च्या मुदत पूर्तीनंतर अंदाजे १५,२३५ रूपये तर दहा वर्षे मुदतीनंतर २३,८८८ रूपये गुंतवणुकदाराला परत मिळतील. एक हजार रूपयांच्या आरडी खात्याची ५ वर्षांनंतर रक्कम ७४,६५७ इतकी होईल. मासिक प्राप्ती योजनेसाठीची गुंतवणूक दीड हजार रूपयांच्या पटीत करण्याची अट कायम असली तरी दर महिन्याची व्याजाची रक्कम पूर्णांकात येण्यासाठी शक्यतो १२ हजार रूपयांच्या पटीत गुंतवणूक करणे हिशोबाच्या दृष्टीने सोयीचे होईल, असे आवाहन अल्पबचत संचालनालयाने केले आहे.

Leave a Comment