एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शनचा भारतात सर्वात मोठा सोलार पीव्ही पॉवर प्रकल्प

मुंबई, दि. ९ – लार्सन अॅण्ड टुब्रो चा एक भाग असलेल्या एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शनने राजस्थानमधील जैसलमेर जिल्हयातील धूरसर गावात रिलायन्स पॉवर लि.ची मालकी असलेला भारतातील सर्वात मोठा सोलार फोटो व्होलटैकवर आधारीत वीजप्रकल्प ४० एमडब्लुपी सुरू केला आहे. सौरऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा इपीसी खेळाडू असलेल्या एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शनने सुरूवातीपासून विस्तृत डिझाईनसह सौरऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी केली आहे. तो १२९ दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्याबरोबर एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शनने मागील आर्थिक वर्षात ११४ एमडब्ल्यू युटिलिटी स्केल असलेले सोलार पीव्ही वीज प्रकल्प सुरू  केले आहेत.
  सोलार पीव्ही ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून ७५ हजारांहून अधिक घरांना ७० दशलक्ष युनिटपेक्षा अधिक स्वच्छ आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित ऊर्जा पुरवली जाणार असून याप्रसंगी नवीन आणि पुर्नवापर ऊर्जा मंत्री फारूख अब्दुला, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, ऊर्जामंत्री जितेंद्र सिंग, रिलायन्स पॉवरचे अध्यक्ष अनिल धीरूभाई अंबानी, तसेच एल अॅण्ड टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पातून निर्माण होणार्‍या स्वच्छ उर्जेच्या माध्यमातून वर्षाला अंदाजे ७०.००० एमटी इतका सीओटू बाहेर पडेल अशी अपेक्षा आहे

Leave a Comment