ब्लॅकबेरीच्या किंमतीत २६ टक्क्यांनी घट

मुंबई, दि. २९ – भारतातील स्मार्टफोनची विक्री वाढविण्यासाठी रिसर्च इन मोशनने (रिम) आपल्या लोकप्रिय ब्लॅकबेरीच्या किंमती २६ टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
  ब्लॅकबेरीचा वापर कॉर्पोरेट विश्वात अधिक केला जातो. तसेच त्याची किंमत अधिक असल्यामुळे सर्वसामान्य लोक सहसा ब्लॅकबेरीचा वापर करत नाहीत. त्यामुळे ब्लॅकबेरीला सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी किंमती कमी करीत असल्याचे रिमचे भारतातील संचालक सुनील दत्त यांनी सांगितले. यामुळे कंपनीचा स्मार्टफोन बाजारातील हिस्सा वाढविण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.
रिमच्या निर्णयामुळे ब्लॅकबेरी फोनच्या किमती १८ ते २६ टक्क्यांनी कमी होणार आहेत. रिमने ब्लॅकबेरी-८५२०, ९८६०,९३८० व ९३६० या चार स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. रिमच्या एकूण व्यवसायापैकी ६० टक्के विक्री या स्मार्टफोनची होत आहे. या आधी कंपनीने टॅबलेटची विक्री वाढविण्यासाठी प्ले-बुकच्या किंमतीही कमी केल्या होत्या. ब्लॅकबेरीच्या किंमती कमी केल्यामुळे विक्री आणखी वाढेल अशी आशा सुनील दत्त यांनी व्यक्त केली आहे.
  नव्या किंमती-
फोन                आधीची किमत            आताची किमत
ब्लॅकबेरी-८५२०            १०,९९० रू.            ८,९९० रू.
ब्लॅकबेरी-९८६०            २९,९९० रू.                 २१,९९० रू.
ब्लॅकबेरी -९३६०            २०,९९० रू.                 १६,९९० रू.
ब्लॅकबेरी -९३६०            १९,९९० रू.                        १८,९९० रू.

Leave a Comment