प्रचारात शिवराज पाटील यांचे छायाचित्र; आचारसंहिता भंगाची तक्रार

लातूर, दि. ९ – काँग्रेसच्या प्रचार साहित्यात राज्यपाल असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचे छायाचित्र वापल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून घटनात्मक प्रमुख असलेल्या निष्पक्ष भूमिकेतील राज्यपालांचे छायाचित्र प्रचारात वापरणे हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
  काँग्रेसच्या पोस्टर्स, हँडबिलं, होर्डींग्ज आणि जाहिरातीतसुध्दा शिवराज पाटील दिसतात. राज्यपाल हे पक्षनेते नव्हे तर राज्याचे प्रमुख असतात त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग आहे, असा आक्षेप लोकलढा, राष्ट्रीय एकता परिषद, पदवीधर पत्रकार संघ यांनी घेतला आहे. या प्रकरणी आमदार अमित देशमुख, काँग्रेसचे मनपा उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीवर प्रा. मधुकर मुंडे, एम.बी.पठाण, मधुकर कांबळे, लहूजी शिंदे आणि काकासाहेब घुटे यांच्या सह्या आहेत.

Leave a Comment