
पेशावर, दि. ४ – पाकिस्तानमधील अशांत आदिवासी भागात बुधवारी एका गाडीला लक्ष्य बनवून बॉम्बस्फोट करण्यात आला. या स्फोटात सहा ठार झाले असून नऊ जण जखमी झाले.
सदर गाडीमध्ये १५ पुरूष खुराकाई गावाहून खैबर जिल्हयातील प्रमुख शहर जामरूडला जात होते. गाडी एका अरूंद दरीच्या बाजूने जात असताना बॉम्बस्फोट झाला. खरेदी करण्यासाठी काही प्रवासी शहराकडे जात होते. दरम्यान, यामध्ये सहा जण ठार झाले असून नऊ जखमी झाले असल्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी शकील खान उमरझाई यांनी सांगितले.
‘जखमी झालेल्यांपैकी तिघे गंभीर जखमी आहेत. स्फोटात आयईडीचा वापर केला होता की गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता याबाबत माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानमधील खैबर जिल्हा हा इतर सात जिल्ह्यांप्रमाणे अर्ध स्वायतत्ता असलेला आदिवासी भाग आहे. येथून तालिबान आणि अल कायदाचे दहशतवादी पाकिस्तानी, अफगाण आणि पश्चिमी ठिकांणावर हल्ले करण्याची योजना आखतात.
