जॉन लवकरच लग्नाच्या बेडीत !

अभिनेता जॉन अब्राहमच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्याने त्याची एक्स गर्लङ्ग्रेंड बिपाशा बासुही चर्चेत आली आहे. जॉन आणि बिपाशाचे ब्रेकअप झाल्यानंतर तिचे नाव जोश हरने, राणा दगुबाती आणि शाहिद  कपूर यांच्याशी जोडले गेले. मात्र तिने प्रत्येकवेळी त्याचा इंन्कार केला होता. आपण मिस्टर परङ्गेक्टची वाट पाहात असल्याचे सांगणारी बिपाशाही आता लग्नाच्या बेडीत अडककणार असल्याची चर्चा आहे. तसेच या ब्लॅक ब्युटीने तिचा एक्स बॉयङ्ग्रेंड जॉनला चिमटा काढला आहे. ती म्हणाली, जॉनचे आता वय झाले आहे, त्याने लवकर लग्न करुन घेतले पाहिजे. यातून बिपाशाला आता काय सुचवायचे आहे हे तिच तिलाच माहित. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार जॉनने प्रिया रुंचालसोबत साखरपूडा उरकून घेतला असून येत्या मे महिन्यात ते लग्न करणार आहेत.

Leave a Comment