अमेरिकी ड्रोन हल्ल्यात चार दहशतवादी ठार

मिरानशहा, दि. ३० – पाकिस्तानच्या उत्तर वझारिस्तानच्या दुर्गम भागात अमेरिकेने शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार दहशतवादी ठार झाले आहेत. येथील रहिवाशी भागात असलेल्या एका घरावर अमेरिकन ड्रोन विमानाने पहाटे तीनच्या सुमारास क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात तालिबान व अल कायदा या दहशतवादी संघटनांचे चार दहशतवादी ठार झाले तर काही जखमी झाल्याचे अमेरिकन अधिकार्‍यांनी सांगितले.
  मात्र तालिबानी गटांनी या हल्ल्यात ठार झालेले अरब नागरिक होते, असे स्पष्टीकरण दिले आहे. तर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये मुख्यतः सामान्य नागरिकांचाच मृत्यू होत असल्यामुळे आता हे हल्ले थांबविण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे.
   पाकिस्तानच्या या आरोपांचा इन्कार करताना अमेरिकने ड्रोन हल्ल्यात आजुबाजुच्या परिसराचे कमीत कमी नुकसान होत असल्याचा पवित्रा घेतला आहे. उत्तर वझारिस्तानमधील दुर्गम भागाचा फायदा घेऊन दहशतवादी संघटना नाटो व अमेरिकन सैन्यावर वारंवार हल्ले करतात, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. 

Leave a Comment