
चेन्नई, दि. ५ – भारतीय क्रिकेट नियंत्रक बोर्ड (बीसीसीआय) चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आयपीएलमध्ये होणार्या नफ्याचा उपयोग नवीन खेळाडूंवर करण्याचे ठरविले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत होणार्या नफ्याचा उपयोग नवीन आणि तरूण खेळाडूंच्या भविष्यातील प्रगतीसाठी खर्च करण्यात येणार आहे. या फायद्याचा वापर ज्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटमध्ये आपले योगदान दिले आहे, अशा खेळाडूंसाठी देखील करण्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.