अॅपलच्या नव्या आयपॅडची विक्रमी विक्री

आयपॅड उत्पादनातील आघाडीची कंपनी अॅपलने तीनच दिवसांपूर्वी बाजारात आणलेल्या आयपॅडने ३० लाख विक्रीचा विक्रमी टप्पा गाठला आहे. आतापर्यंतची आयपॅडची ही सर्वात जबरदस्त एन्ट्री ठरली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये प्रमुख देशांमध्ये तब्बल ही विक्री झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

उच्च दर्जाचा नवा डिस्प्ले, चांगल्या प्रतीचा कॅमेरा, वेगवान प्रोसेसर व एलटीई सेल्युलर नेटवर्क अशा वैशिष्टांचा भरणा असलेल्या या टॅबलेट पीसी ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. हा नवा आयपॅड बाजारात दाखल होताच ग्राहक त्यावर अक्षरशः तुटून पडले आणि फक्त तीन दिवसांतच ३० लाख आयपॅड हातोहात विक्री झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

यामुळे कंपनी २.६५ डॉलर तिमाही डिव्हीडंट आणि १० अब्ज डॉलरचे शेअर पुनर्खरेदी योजनेवर १०० अब्ज डॉलर खर्च करणार आहे. आयपॅडच्या इतिहासातील आतापर्यंतची ही जबरदस्त एन्ट्री असल्याचे पलचे म्हणणे आहे.

Leave a Comment