हिंदू कॅलेंडर संघ स्थापन

मुंबई, दि. ५ –  जानेवारी १  ते ३१ डिसेंबर हे ग्रेगरीयन कॅलेंडर ब्रिटीशांच्या अंमलात १७५४ च्या ब्रिटीश कॅलेंडर कायद्यानुसार लागू झाले. त्यात असमान तारखा असलेल्या महिन्यांचे पगार बुडवला जातो असा दावा शरद वेलणकर यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ३१ तारीखच बिनपगारी असते. वर्षात ३१ दिवस असलेले एकूण ७ महिने आहेत. परंतु वर्ष ३६७ दिवसांचे नसल्यामुळे फेब्रुवारी हा महिना २८ दिवसांचा करावा लागला. त्यामुळे ७ दिवसांमुळे बुडणार्‍या ७ पगारांपैकी २ पगार वाचले. तरीसुद्धा दरवर्षी ५ पगार बुडतातच, असे वेलणकर सांगतात.
   शरद वेलणकर यांनी २००७ मध्ये शास्त्रज्ञ ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रपती असल्याने जनहित याचिका संदर्भाने त्यांना नोटीस पाठवली होती. याप्रकरणी त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे लक्ष वेधले. तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह हे अर्थतज्ज्ञ असल्याने त्यांनी ३१ तारखेचा व ३० तारखेचा पगार सारखाच असू शकतो का ? असे विचारण्यासाठी त्यांनादेखील नोटीस पाठवली होती. त्यांनीही सायन्स आणि टेक्नॉलॉजी मंत्रालयाचे लक्ष वेधले. म्हणून सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीने ग्रेगरीयन कॅलेंडर शास्त्रशुद्ध नाही, गणिताला धरून नाही असे स्पष्ट करीत ही चुकीची प्रथा पाळली जात असल्याचे उत्तर पाठवले. तसेच जनतेने ब्रिटीश कायदा पाळण्याची लोकशाहीला आता मुळीच गरज नाही. लोकजागृती होऊन जनतेने मागणी केल्यास ब्रिटीश कॅलेंडर कायदा रद्द करून ३० तिथीनुसार दर महिन्यांचा पगार सुरू होईल आणि दर तीन वर्षांनी येणार्‍या अधिक महिन्यामुळे एक महिन्याचा अधिक पगार जनतेला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment