भुजबळ, राणे, पतंगराव कदम, विलासराव देशमुख, विखे-पाटील यांच्यासह १० मंत्र्यांवर कॅगचा ठपका

मुंबई, दि. ४ – छगन भुजबळ, नारायण राणे, विलासराव देशमुख, पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह राज्यातील १० मंत्र्यांवर कॅगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा अहवाल सरकार दडपून ठेवत आहे, असा आरोप करत विरोधी पक्षांनी बुधवारी हा अहवाल उघड केला. या अहवालात देण्यात आलेल्या ताशेर्‍यांचा एकनाथ खडसे तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला तपशील पुढील प्रमाणे-

मुंबई एजुकेशन ट्रस्ट, छगन भुजबळ
१.) २००३ मध्ये ४१,३०० मीटर जागा नाशिक येथे सवलतीच्या दरात १ लाख ५५ हजार रूपयांत दिली.
२.) समीर भुजबळ यांनी नाशिक येथील ९१,३०० चौ. मी. सार्वजनिक बांधकाम विभागाची गौण खजिनासाठी राखून ठेवलेली जागा मागितली.
३.) नियमानुसार जागा देता येत नसताना त्यातील ५० हजार चौ. मी. जागा जानेवारी २००१ रोजी इंजिनियरींग कॉलेजला दिली.
४.) अर्थ सचिवांनी हरकत घेतली असताना देखील जागा देण्याचा निर्णय झाला. ९.३९ कोटी रूपयांची जागा ९.०८ लाख रूपयांना दिली.
५.) छगन भुजबळ बांधकाम मंत्री असताना त्यांच्याशी संबंधित ट्रस्टला जागा देणे हे कॉम्प्लीक्ट ऑफ इंटरेस्ट आहे.

सिधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ, नारायण राणे
१.)समाजभवनासाठी १७१९.५ चौ. मी. जागा १०७१२ रूपये वार्षिक भाड्याने
२.) जागेची किंमत ६.६८ कोटी, ’ग्रांड इम्पेरीयल बॅक्वे’ २ लाख रोजचे भाडे, रेस्टॉरंट आणि बारची व्यवस्था

वसंतदादा पाटील प्रतिष्ठा
१.) बेकायदेशीर बांधकाम १७.३० कोटी थकले

भारती विद्यापीठ, पतंगराव कदम
१.) लोहगाव पुणे १९,२०० चौ.मी. जागा बाजारभाव ४.८० कोटी, सवलतीच्या दरात मिळाली. वापर केला नाही, त्यामुळे नियमानुसार परत घेण्याचा रिपोर्ट सादर होवून कार्यवाही नाही.
 रिलायन्स कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल
१.) जागेची मालकी बदलली १७४.८८ कोटी भरणे आवश्यक होते.
२.) बेड चार्जेस १५ हजार ते २० हजार
३.) धर्मदाय कायद्याप्रमाणे ४० टक्के रिझर्व बेड्स नाही.

 मांजरा एज्युकेशन सोसायटी (बोरीवलीची जागा), विलासराव देशमुख
१.) ४ अर्जदार असताना मुख्यमंत्र्यांनी २८ सप्टेंबर २००५ ला मांजरा एज्युकेशन सोसायटीलाच दिली.
२.) ६ वर्षांत त्यांनी बांधकाम सुरू केले नाही, आता बदलवून मागत आहेत.
३.) ३० कोटीची जागा ६ कोटीमध्ये दिली आणि अॅग्रीमेंट मध्ये २ वर्षांत वापर झाली नाही, तर जागा शासनजमा होईल, हा अत्यावश्यक        (मेंडेटरी क्लॉज) जाणून बुजून वगळला.

  विखे-पाटील फाऊंडेशन, राधाकृष्ण विखे-पाटील
१.) पुणे येथे ५३९६ चौ. मी. जागा डिग्री कॉलेज करीता अॅलाट केली.
२.) सवलतीच्या दरात त्याची किंमत ९१ लाख होत असताना १७ लाखात जागा दिली. ७३ लाखांचे नुकसान
  मराठवाडा मित्र मंडळ
१.) पुणे येथील प्राथमिक शाळा आणि हॉस्टेल करीता २००२ मध्ये दिली.
२.) २९,५५० चौ.मी. जागा हवेली येथे ४८०२ रूपयांना दिली.
३.) इंजिनियरींग आणि एम. बी. ए. कॉलेज उघडले. कोट्यवधी अनर्जित रक्कम बुडवली.
  नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी
१) ११२६.४५ चौ. मी.चा प्लॉट कार्यालय बांधायला दिला.
२.) कमर्शीयल बांधकाम करून विकून टाकले.
३.)२.०२ कोटींची जागा घेण्याचे टाळण्यात येत आहे.

  आशीर्वाद कॉ. हाऊसिग सोसायटी
१.) माहिती दडवून ठेवणे व चुकीची शपथ पत्रे देणे.
२.) उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार एनटायटल्ट असलेल्या क्षेत्रफळापेक्षा अधिक क्षेत्रफळ प्राप्त होणे.

  सिम्प्लेक्स मिल रीडेव्हपलमेंट
१.) बेकायदेशीर मान्यता दिली. लीज संपली असताना २००४ बांधकाम सुरू.
२.) २००६ मध्ये जिल्हाधिकार्‍यांचे ना हरकत प्रमाणपत्र आणि २००९ मध्ये रेट्रोस्पेक्टिव परमिशन
३.) शासनाच्या महसुलाची मोठी हानी

Leave a Comment