करिना झाली बीझी

बॉलिवूडच्या टॉप मोस्ट यादीत असलेली अभिनेत्री करीना कपूर सध्या गायब झाली आहे. करीनाला अचानक गायब व्हायला झालं तरी काय असा प्रश्न पडला असेल ना. अहो, करीना गायब आहे हे खरं आहे, मात्र तिचे कुणी अपहरण केलेलं नाही. करीना सध्या आपल्या आगामी ‘हिरॉईन’च्या शुटींगमध्ये इतकी बिझी झाली आहे की, ती कुणालाच भेटत नाही आहे.
मधुर भांडारकरच्या आगामी हिरॉईन चित्रपटाचं शुटींग सध्या जोरात सुरु आहे. या शुटींगमध्ये करीना रात्रदिवस काम करत आहे. या सिनेमाचे काही सीन ज्या लोकांनी बघितले आहेत, त्यांच्या मते करीना या सिनेमाद्वारे इतिहास रचणार आहे. करीनाही हा सिनेमा उत्कृष्ट व्हावा यासाठी जीवतोड मेहनत घेत आहे. हिरॉईन चित्रपटाच्या शुटिंगमुळे करीना तिच्या आगामी‘एजंट विनोद’च्या प्रमोशनमध्येही सहभागी होत नाही आहे. पाहिलतं ना, करीनाचं डेडिकेशन.

Leave a Comment