
अहमदाबाद, दि. ४ – गुजराती तांत्रिकी विशेषज्ज्ञ सॅम पित्रोदांचे नाव भारताच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत पुढे येत आहे.
भारताच्या १६ व्या राष्ट्रपतीची निवड जुलै २०१२ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे या शर्यतीत आता पित्रोदांचे नाव समोर आले आहे. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यामधील हलवाड तालुक्यातील टीकर गावातील भौतिक शास्त्रातील पदवीधर असलेले सत्यनारायण गंगाराम पांचाळ उर्फ सॅम पित्रोदा या शर्यतीत जिंकले तर देशातील सर्वोच्च पदावर आरूढ होणारे पहिले गुजराती असतील.
अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराजयाचा सामना करावा लागलेला काँग्रेस पक्ष कमजोर झाला आहे. तर या महत्त्वपूर्ण मुद्यावर पाठींबा देण्यासाठी विरोधक देखील मजबूत सौदा करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक मान्यता मिळेल असा उमेदवार पुढे करण्याकडे काँग्रेसचा कल असेल. अल्पसंख्यांक, दलित किवा ओबीसी वर्गातील उमेदवार आपला राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु राजकारणापेक्षा पुढे असलेला, मुत्सद्दी आणि देशासाठी एक जागतिक राजदूताची निवड करण्याची इच्छा देखील प्रकट होत आहे.
lets see who will be the next president.